व्हीएसआरएस मराठी न्युज –७४व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून पद्म नागरी पुरस्कारांची करण्यात आली आहे. यामध्ये पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्कारांचा समावेश आहे.
महाराष्ट्रातून गडचिरोलीच्या झाडीपट्टी रंगभूमीचे कलाकार परशुराम कोमाजी खुने यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. भात लावणीच्या हंगामात सादर केले जाते. त्यांनी पाच हजाराहून अधिक नाटकांमध्ये जवळपास 800 वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. परशुराम कोमाजी खुने यांचे नक्षलग्रस्त भागातील दिशाभूल झालेल्या तरुणांचे पुनर्वसन करण्यातही मोठे योगदान राहिले आहे. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
यामध्ये महाराष्ट्रातील 12 जणांना विविध पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये एका व्यक्तीला पद्मविभूषण, तीन जणांना पद्मभूषण तर आठ जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत.
यामध्ये प्रसिद्ध तबलावादक झाकिर हुसेन यांना कला क्षेत्रातून पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यानंतर कुमार मंगलम बिर्ला (व्यापार आणि उद्योग), सुमन कल्याणपूर (कला), दिपक धर (विज्ञान आणि अभियांत्रिकी) यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.
भिकू रामजी इदाते (समाजसेवा), राकेश झुनझुनवाला -मरणोत्तर (व्यापार आणि उद्योग), परशुराम खुने (कला), प्रभाकर भानुदास मांडे (साहित्य आणि शिक्षण), गजानन माने (समाजसेवा), रमेश पतंगे (साहित्य आणि शिक्षण), रवीना टंडन (कला), कुमी नरिमन वाडिया (कला) यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
Discussion about this post