व्हीएसआरएस मराठी न्युज -राज्यातील सत्तांतरानंतर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद रिक्त झाले होते. विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याकडे आहे.
महाराष्ट्र विधीमंडळाच्या सचिवालयाकडून अधिसूचना प्रसिद्ध करत यासंबंधी माहिती देण्यात आली आहे. विधानपरिषदेचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र विधानपरिषदेतील शिवेसना पक्षास अधिकृत विरोधी पक्ष म्हणून मान्यता देण्यात आली आहे. तसंच शिवसेनेचे औरंगाबादमधील आमदार अंबादास दानवे यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
विधान परिषदेत शिवसेनेकडे संख्याबळ अधिक असल्याने विरोधी पक्षनेतेपदी अंबादास दानवे यांची नियुक्ती करावी असे पत्र शिवसेनेतर्फे देण्यात आले होते. त्यानुसार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदी अंबादास दानवे यांची नियुक्ती झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
यादरम्यान उद्धव ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. विधानपरिषदेत शिवसेना पक्षाला अधिकृत विरोधी पक्ष म्हणून मान्यता देण्यात आली आहे.
Discussion about this post