व्हीएसआरएस मराठी न्युज मुंबई -महाराष्ट्रात आता सीबीआयला (CBI) तपास करायचा असेल महाराष्ट्र सरकारची परवानगी घ्यावी लागणार नाही कारण महाराष्ट्रातली सीबीआयवरील बंदी लवकरच उठवली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
महाविकास आघाडी सरकारने राज्यात तपास करण्यासाठी सीबीआयला बंदी घातली होती ती उठवण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
महाविकासआघाडी सरकार सत्तेत असताना परवानगीशिवाय राज्यात सीबीआयला तपासणीचे अधिकार नव्हते. परंतु आता सत्तांतर झाल्यानंतर शिंदे आणि फडणवीस सरकारकडून सीबीआयला तपासाचे अधिकार दिले जाणार आहेत. याबद्दलचा निर्णय लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
Discussion about this post