व्हीएसआरएस मराठी न्युज -बिहार
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी उपमुख्यमंत्री तेजश्वी यादव आणि जेडीयू अध्यक्ष लालन सिंह यांच्यासह दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांची भेट घेतली.
यावेळी यांच्यामध्ये खर्गे यांच्या निवासस्थानावर चर्चा देखील झाली. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर नितीश कुमार यांनी राहुल गांधी यांची घेतलेली पहिली भेट आहे.
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात लढणाऱ्या भाजपच्या एकाधिकारशाहीला टक्कर देण्यासाठी देशातील विरोधी पक्षांनी आता चांगल्याच हालचाली सुरू केल्या आहेत. पुढल्यावर्षी म्हणजेच 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हालचालींनी वेग घेतला आहे.
Discussion about this post