व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -चार राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपला मिळालेल्या यशानंतर पिंपरी भाजपच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व नाचून जल्लोष साजरा केला आहे.
भाजपचे उत्तराखंड, मणिपूर, गोवा व उत्तरप्रदेश या चारही राज्यांत भाजपाचा दणदणीत विजय झाला असून आज भाजपा पिंपरी कार्यालय येथे मोठा जल्लोष साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी महापौर माई ढोरे, स्थायी समिती सभापती ॲड. नितीन लांडगे, भाजपा प्रदेश सचिव श्री. अमित गोरखे, मा. अध्यक्ष नवनगर विकास प्राधिकरण श्री. सदाशिव खाडे, पिंपरी चिंचवड भोसरी विधानसभा प्रभारी, श्री. अमोल थोरात, भाजपा सरचिटणीस श्री. राजू दुर्गे, मा. उपमहापौर श्री. केशव घोळवे, शहर सुधारणा समिती सभापती, श्रीमती. अनुराधा गोरखे, भाजपा युवा मोर्चा पदाधिकारी श्री. हर्षल ढोरे, श्री. संदीप अण्णा कस्पटे, श्री. मोरेश्वर शेडगे आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या जल्लोषात बेधुंद होऊन नाचत जल्लोष साजरा करताना दिसून आले. महाविकास आघाडी सरकारतर्फे इतर राज्यांमध्ये भाजपला शह देण्याचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात आला. परंतु महा विकास आघाडी सरकारचा हा प्रयत्न पुन्हा एकदा जनतेने मोडीत काढून भाजपवर विश्वास दाखवला; असल्याचे मत व्यक्त केले. या निकालाचे परिणाम येणाऱ्या निवडणुकांमध्ये देखील महाराष्ट्र राज्यात दिसून येतील असे मत यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांतर्फे व्यक्त करण्यात आले आहे.
Discussion about this post