व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी: दि-३ एप्रिल २०२३ (साेमवार): पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने दरवर्षी महात्मा जोतिबा फुले व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात येते. यावर्षी या जयंती कार्यक्रमात महानगरपालिकेने प्रमुख अतिथी म्हणून पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना आमंत्रित केले आहे. चंद्रकांत पाटील यांना या प्रमुख पाहुणे पदावर बाजुला करण्यात यावे अशी मागणी शहरातील सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
गेल्या काही महिन्यापुर्वीच याच पिंपरी चिंचवड शहरात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांच्या बाबतीत अवमानकारक वक्तव्य केले हाेते नतंर चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती. सदरचे प्रकरण ताजे असतानाच पिंपरी चिंचवड महानगरपालिका चंद्रकांत पाटील यांना आमंत्रित करून खोडसाळ प्रकार करून जयंती उत्सवाला गालबोट लावण्याचा प्रकार करीत आहे. त्याचा आम्ही संपूर्ण आंबेडकरी समाज पिंपरी चिंचवड शहरच्या वतीने निषेध करीत आहोत. असल्याचे सचिन काळभोर यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांना कळवले आहे.
मुख्यमंत्र्यांनी सदर प्रकरणात लक्ष घालून चंद्रकांत पाटील यांना सदर कार्यक्रमात उपस्थित राहण्यास मज्जाव करावा अन्यथा आम्ही चंद्रकांत पाटील यांचा लोकशाही मार्गाने सनदशीरपणे विरोध करू अशा इशारासुध्दा सचिन काळभोर यांनी दिला आहे. काळभोर यांच्या या आक्रमक भुमिकेमुळे नविन वाद निर्माण हाेण्याची चिन्हे दिसत आहेत.
Discussion about this post