व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -एमएनजीएल प्रशासनाने जुलै महिन्यात सीएनजीच्या दरात वाढ केल्यानंतर आता त्यात पुन्हा वाढ केली आहे. सीएनजीचा दर आता 85 रुपयांवरून थेट 91 रुपये झाला आहे.
तब्बल 6 रुपयांनी वाढ झाल्यामुळे रिक्षाचालक नाराज झाले आहेत. ही दरवाढ बुधवार (दि. 3) मध्यरात्रीपासून पुणे, पिंपरी-चिंचवड, तळेगाव, चाकण भागात लागू होईल. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड म्हणजेच एमएनजीएलमार्फत पुरवठा होणार्या सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. मागच्या महिन्यात एमएनजीएलने 6 जुलै 2022 च्या मध्यरात्रीपासून पुणे, पिंपरी-चिंचवड, तसेच चाकण, तळेगाव आणि हिंजवडी या भागात 3 रुपयांनी दरवाढ लागू केली होती.
तेव्हा सीएनजी 82 रुपये प्रति किलो मिळत होता. वाढ झाल्यावर तो 85 रुपयांनी मिळू लागला. आता महिन्याभरातच एमएनजीएल प्रशासनाने डोमेस्टिक नैसर्गिक वायूच्या इनपूट खर्चात वाढ झाल्यामुळे सीएनजीच्या किमतीत 6 रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे आता सीएनजी 91 रुपयांना मिळणार आहे. सीएनजीवर सर्वाधिक रिक्षाचालक आणि पीएमपीच्या बस अवलंबून आहेत. सीएनजी वाढल्यामुळे रिक्षाचालकांमध्ये नाराजीचे वातावरण असून, ते भाडेवाढ करण्याची मागणी करत आहेत.
Discussion about this post