व्हीएसआरएस मराठी न्युज –
कोश्यारींनी घेतलेल्या निर्णयांची चौकशी व्हायला हवी, असेही शरद पवार म्हणाले. ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
शरद पवार म्हणाले की, महाराष्ट्राच्या इतिहासात कधीही अशी व्यक्ती राज्यपाल झाली नव्हती, अशी व्यक्ती आपण पहिल्यांदाच पाहिल्याचे आता केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींनी त्यामध्ये बदल केला ही समाधानाची बाब असल्याचे पवार म्हणाले. जे जे संविधानाच्या विरोधात झाले त्याची चौकशी होणं गरजेच असल्याचे शरद पवार म्हणाले.
अशी व्यक्ती झाली नव्हती.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाला आहे. रमेश बैस (Ramesh Bais) यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, राज्यपालांनी घटनेच्या विरोधात जाऊन काम केलं. महाराष्ट्राच्या इतिहासात कधीही अशी व्यक्ती राज्यपाल झाली नव्हती. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची (Sharad Pawar) यांनी दिली आहे.
कोण आहेत नविन राज्यपाल रमेश बैस?
रमेश बैस यांच्या जन्म मध्य प्रदेशमधील रायपूरमध्ये झाला आहे. आता रायपूर छत्तीसगडमध्ये आहे. मध्य प्रदेश भाजपचे ते उपाध्यक्ष होते.
बैल यांनी याआधी झारखंड आणि त्रिपुराचे राज्यपाल म्हणून काम पाहिले आहे. तसेच वाजपेयी सरकारच्या काळात त्यांनी मंत्रिपदही सांभाळले आहे.
बैस हे सध्या झारखंडचे राज्यपाल आहेत. यापुर्वी २०१९ मध्ये त्यांनी त्रिपुराचे राज्यपाल म्हणूनही काम केलं आहे.
सलग सात वेळा ते खासदार म्हणून निवडून आले आहेत. १९९९ पासून अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये त्यांनी केंद्रीय पर्यावरण आणि वन राज्यमंत्री म्हणून काम केलं आहे.
Discussion about this post