व्हीएसआरएस मराठी न्युज -राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या कारला परळीमध्ये मंगळवारी 3 जानेवारी 2023 रोजी रात्री अपघात झाला आहे. यामध्ये मुंडे यांच्या छातीला आणि डोक्याला मार लागला. या अपघातात मुंडेंच्या कारचंही मोठे नुकसान झाले. त्यांच्या या अपघातानंतर राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक नेत्यानी धनंजय मुंडे यांची भेट घेतली. आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडे यांच्या भेटीला गेले आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडे यांना भेटून त्यांच्या तब्येतीची विचारपुस केली आहे. या कारणामुळे फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि पंकजा मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांची भेट घेतली.
Discussion about this post