पिंपरी | (व्हीएसआरएस न्यूज) | चिंचवड शहरात वर्षभर ई-कचरा संकलन अभियान राबविण्यात येणार आहे. घातक कचरा संकलित करून त्याचा पुनर्वापर व शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावली जाईल, अशी माहिती महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिली. महापालिकेच्या भोसरीतील ई-वेस्ट सेंटर येथे ई-कचरा संकलन व्हॅनच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, सहशहर अभियंता संजय कुलकर्णी, माहिती व जनसंपर्क विभागप्रमुख रविकिरण घोडके, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, ईसीएच्या विनिता दाते, डॉ. आशा राव, नताशा गांगल, हिरामण भुजबळ यांच्यासह ग्रीनस्केपचे प्रमुख रुपेश कदम उपस्थित होते.
Discussion about this post