व्हीएसआरएस मराठी न्युज –परराष्ट्र मंत्रालयाने पारपत्राशी संबंधित सेवा सुलभ करण्यासाठी आणखी एक निर्णय जाहीर केला आहे. २८ सप्टेंबर २०२२ पासून देशभरातील सर्व ऑनलाइन पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रांवर (पीओपीएसके) पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट्स (पीसीसी) साठी अर्ज करण्याची सुविधा मिळणार आहे.
यामुळे पीसीसी अपॉइंटमेंटसाठीची तारीख लवकर मिळेल. या निर्णयामुळे परदेशात नोकरीसाठी जाणाऱ्या भारतीय नागरिकांना सुविधा होईल तसेच शिक्षण, दीर्घकालीन व्हिसा आणि इमिग्रेशन यासाठी लागणाऱ्या पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेटसाठीही मदत होईल. गोवा पारपत्र कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे.
पोस्ट कार्यालयात ही सुविधा सुरु झाल्याने नागरिकांची मोठ्या अडचणीतून सूटका झाली आहे. अर्जदाराला आता ऑनलाईन पोस्ट कार्यालयाच्या पासपोर्ट सेवा केंद्रात अर्ज करु शकता.
अर्जदार अगोदरच अपॉईंटमेंट घेऊ शकतो. त्यामुळे त्याचा वेळ ही वाचेल. त्याचा पासपोर्ट ही लवकर मिळेल. त्यामुळे परदेशी नोकरीसाठी जाणाऱ्या, शिक्षणासाठी जाणाऱ्या तरुणाला मोठा दिलासा मिळणार आहे. नव्या सेवेमुळे छोट्या शहरातील नागरिकांनाही सहज पासपोर्ट काढता येणार आहे.
Discussion about this post