व्हीएसआरएस मराठी न्युज –काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ताप आल्यानंतर गुरुवारी त्यांना सर गंगाराम रुग्णालयात आणले होते.
डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांना ठेवण्यात आले आहे. सोनिया गांधी यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाने दिली आहे. सर गंगाराम रुग्णालयाकडून जारी करण्यात आलेल्या हेल्थ बुलेटिननुसार, सोनिया गांधी यांच्यावर डॉक्टर अरूप बासू यांच्या देखरेखीखाली उपचार केले जात आहेत. त्यांना २ मार्चला ताप आला होता.
त्यानंतर रुग्णालयात आणण्यात आले. रुग्णालयात त्यांच्या अनेक तपासण्या करण्यात आल्या आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचंही सांगण्यात आलं आहे.
Discussion about this post