व्हीएसआरएस मराठी न्युज -मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना EDचे समन्स आले आहे. त्यांना ५ जुलै रोजी ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संजय पांडे हे ३० जून रोजी सेवानिवृत्त झाले आहेत.
मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावर असताना त्यांचा कार्यकाळ वादग्रस्त राहिला आहे, त्याचबरोबर त्यांच्यावर बऱ्याचवेळा वेगवेगळे आरोप करण्यात आले होते. त्याच आरोपाखाली त्यांना समन्स पाठवल्याची माहिती आहे.
Discussion about this post