पिंपरी | आरोपीने व्हॉट्सअपवर मेसेज करुन ‘तुझ्यासाठी पोलंडवरुन सोने व हि-याचे ज्वेलरी तसेच रोख रकमेचे पार्सल पाठविले आहे, ते कस्टममधुन सोडवुन घे’, असे फिर्यादीला सांगितले. इन्स्टाग्रामवर मैत्री करुन आरोपीने फिर्यादीचा विश्वास संपादन केला. आरोपींनी कोणत्याही प्रकारचे पार्सल न देता फिर्यादीची फसवणुक केली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. आरोपी मोबाईल नंबरवरील अनोळखी महिला तसेच एकजण यांनी पार्सलची कस्टम डयुटी, हायकोर्ट, मनी लॉन्ड्रींग, पोलीस व्हेरिफिकेशन, ट्रान्सफर चार्जेस, इन्श्योरन्स, स्टॅम्प चार्जेसच्या नावाखाली वेगवेगळ्या बँक खात्यावर फिर्यादीला एकुण ११,४९,०८० रुपये इतकी ऑनलाईन रक्कम भरायला भाग पाडले.
ही घटना (दि. १२/०१/२०२३ ते दि.०६/०२/२०२३) फिर्यादीच्या राहत्या घरी ताथवडेत घडली. २४ वर्षीय महिला फिर्यादीने आरोपी आकाश सिंग (पुर्ण नाव-पत्ता माहित नाही), मोबाईल नंबर (९२३३२००५०७ व ८४४८९०४८१२) वर बोलणारे इसम, अनोळखी महिला, तसेच प्रकाश (पुर्ण नाव-पत्ता माहित नाही) यांच्या विरोधात फिर्याद दिली .
वाकड पोलिसांनी ११९/२०२३ भा.द.वि. कलम ४२०, ४१९ व माहिती तंत्रज्ञान कायदा सन २००८ चे कलम ६६ (सी) (डी) अन्वये आरोपींविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला .
Discussion about this post