मुंबई | (व्हीएसआरएस न्यूज) | भारतीय नौदलाच्या ताफ्यातील हेलिकॉप्टर बुधवारी नियमित उड्डाण करत असताना मुंबईजवळ समुद्रात आणिबाणीच्या स्थिती उतरवण्यात आले. भारतीय नौदलाचे हेलिकॉप्टर बुधारी आणीबाणीच्या स्थितीत मुंबईनजिक समुद्रात उतरवण्यात आले. हेलिकॉप्टरमधील तीन्ही कर्मचाऱ्यांना वाचवण्यात यश आले आहे. दरम्यान या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. या हेलिकॉप्टरचे मोठे नुकसान झाले असून नौदलातील तीन कर्मचाऱ्यांना सुखरुप बाहेर काढण्यात आले.
भारतीय नौदलाचे एएलएच मुंबईपासून नियमित उड्डाण करत असना तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे हेलिकॉप्टर समुद्रात उतरवण्यात आले. याबाबतची माहिती मिळताच तात्काळ शोधकार्य व बचावकार्य हाती घेण्यात आले. दरम्यान, याप्रकरणी नौदलाकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. माहिती पश्चिम नौदल कमांडच्या एका अधिकाऱ्यांनी दिली.
Discussion about this post