व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -धरण परिसरात पावसाचे पुनरागमन गुरुवार पासून झाले आहे. (Pavana Dam) काल सोमवारी ते आज मंगळवार सकाळ पर्यंत धरण क्षेत्रात 52 मिलिमीटर पाऊस झाला आहे.
पवना धरण परिसरात गेल्या वर्षी आजच्या तारखे पर्यंत झालेला एकूण पाऊस 1972 मिमी होता. (Pavana Dam) तसेच आजचा पाणीसाठा 82.42 टक्के आहे.
बंगालच्या उपसागरापासून दक्षिण महाराष्ट्र ते उत्तर केरळ किनारपट्टीलगतच्या हवामानात होत असलेल्या उल्लेखनीय बदलांमुळे मुंबईसह संपूर्ण राज्यात ठिकठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद होत असून, काही ठिकाणी अतिवृष्टी होत आहे.
पुढील तीन दिवस हीच परिस्थिती कायम राहणार असून, मंगळवारी पालघर, ठाणे, नाशिक, पुणे, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांना हवामान खात्याने रेड अलर्ट दिला आहे.
Discussion about this post