व्हीएसआरएस मराठी न्युज -संतोष परब हल्लाप्रकरणी आमदार नितेश राणे यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे. या प्रकरणी मंगळवारी सुनावणी पार पडली होती. त्यावर आज सिंधुदुर्ग न्यायालयाने निर्णय दिला आहे.
भाजप आमदार नितेश राणे हे सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीदरम्यान शिवसेनेच्या संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी अडचणीत आले आहेत. नितेश राणे यांना सध्या न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून त्यांच्या नियमित जामिनासाठी सिंधुदुर्ग न्यायालयात मंगळवारी सुनावणी पार पडली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेत आज निर्णय दिला आहे.
आमदार नितेश राणेंना सुरुवातीला पोलीस कोठडी देण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर तब्येतीच्या कारणास्तव त्यांना रुग्णालयात हलवले गेले. आता सिंधुदुर्ग न्यायालयाने त्यांना 30 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.
Discussion about this post