व्हीएसआरएस मराठी न्युज –दिवंगत खासदार राजीव सातव (Rajeev Satav) यांच्या पत्नी आणि विधान परिषद आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर कसबे दवंडा या गावामध्ये एका व्यक्तीने हल्ला केल्याची घटना घडली आहे.
याप्रकरणी हल्लेखोरावर रात्री उशिरा आखाडा बाळापूर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रज्ञा सातव यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमच्यावर हल्ला करून घरी बसवण्याचा कट असू शकतो अशी प्रतिक्रिया प्रज्ञा सातव यांनी दिली.
संध्याकाळी 8 वाजता कसबे दवंडा या गावी असताना एक अज्ञात व्यक्ती माझ्या गाडीजवळ आला. नियोजित कार्यक्रमाच्या स्थळी असताना, मी भाषण देत असताना एक व्यक्ती मागून आला, मला त्यानं ओढलं आणि हल्ला केला. समोर असलेल्या लोकांनी या व्यक्तीला पकडलं आणि त्याला पोलिसांच्या हवाली केलं.
माझ्या जीवाला धोका असला तरी मी माझ्या लोकांसाठी काम करत राहणार. कारण राजीव भाऊंचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. इतिहासात सावित्रीबाई, इंदिराजी यांसारख्या थोर महिलांवरही हल्ले झाले. मात्र त्यांनी घरी न बसता आपले चांगले काम सुरू ठेवले. हा माझ्यावर पूर्वनियोजित हल्ला होता.
Discussion about this post