पिंपरी | (व्हीएसआरएस न्यूज) | भारतीय जनता पक्षाचे दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या जयंतीनिमित्त कासारवाडी येथे श्री अक्कलकोट स्वामी समर्थ ट्रस्ट व कै.भिमराव जवळकर प्रतिष्ठानच्या यांच्यावतीने शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून अनोख्या पद्धतीने
लोकनेत्याला जयंतीनिमित्त आदरांजली अर्पण करण्यात आली.
कासारवाडी येथील डी एम के इंटरनॅशनल शाळेमध्ये आयोजित कार्यक्रमात भाजपा उपाध्यक्ष प्रकाशतात्या जवळकर,स्विकृत नगरसेवक संजयभाऊ कणसे, उद्योजक रघुनाथ जवळकर, सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा जवळकर यांच्यासह उपस्थित अन्य नागरिकांनी लक्ष्मणभाऊंच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
यावेळी डी एम के इंटरनॅशनल शाळेमधील दहावी बोर्ड परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना गाईड्स व अन्य शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी तात्या जवळकर, अंबादास साठे, मंगेश मोरे, सागर फुगे, कैलास जाधव मोनिका कर्नावट , ममता कांबळे महानंदा स्वामी, ज्ञानेश्वरी काळे, भाग्यलक्ष्मी सल्ला, कृतिका गवस, दीप्ती घोरपडे, अमृता दीक्षित आदी मान्यवर उपस्थित होते.
अजय जाधव यांनी सूत्रसंचालन केले तर सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा जवळकर यांनी आभार मानले.
Discussion about this post