पुणे | (व्हीएसआरएस न्यूज) | त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणा असलेली पीएमपीएमएलची वाहतूक व्यवस्था भविष्यात खंडित होऊ देणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज (दि.१२) येथे दिली. पुणे देशातील सर्वात जलदगतीने विकसित होणारे शहर आहे. पालकमंत्री पाटील यांनी पीएमपी अधिकारी आणि ठेकेदारांची एकत्रित बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीत ठेकेदारांनी पुकारलेल्या संपावर तोडगा काढण्याबाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी पालमंत्र्यांसह पुणे महापालिका आयुक्त डॉ. विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवडचे आयुक्त शेखर सिंह, पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया, पीएमआरडीएचे आयुक्त राहुल रंजन महिवाल, आमदार सिद्धार्थ शिरोळे आदीसह पीएमपीएमएलचे प्रमुख ठेकेदार उपस्थित होते. यावेळी जानेवारीपर्यंतची संचलन तूट मार्चअखेर पर्यंत द्यावी, तसेच फेब्रुवारी आणि मार्चचे देयक १५ एप्रिलपर्यंत द्यावी, अशा सूचना पालकमंत्री पाटील यांनी पीएमपीएमएलचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांना दिल्या. तसेच, भविष्यात पीएमपीएमएलकडून दर महिन्याला बील दिले जाईल, असे ठेकेदारांना आश्वास्त केले. त्यावर पीएमपीएमएलच्या ठेकेदारांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.
Discussion about this post