व्हीएसआरएस मराठी न्युज –पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचे आज (शुक्रवार) पहाटे वृद्धपकाळाने निधन झाले आहे. त्या 100 शंभर वर्षांच्या होत्या. हिराबेन मोदी यांची तब्येत बिघडली होती, त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी अहमदाबादच्या यूएन मेहता रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत 18 जून रोजी आपला 100 वा वाढदिवस साजरा केला. गुजरात निवडणुकीआधी मार्च 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये आपल्या घरी जाऊन आईचे आशीर्वाद घेतले होते. हिराबेन यांना दोन दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आईच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे. आईमध्ये नेहमीच एका त्रिमूर्तीचा भास व्हायचा असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईचा जन्म 18 जून 1923 रोजी गांधीनगर येथे झाला होता. गांधीनगर शहराच्या सीमेवरील रेसन गावात हिराबेन पंतप्रधानांचे धाकटे बंधू पंकज मोदी यांच्यासोबत राहतात. पंतप्रधान झाल्यानंतर कोणत्याही सुरक्षेशिवाय नरेंद्र मोदी आईला भेटण्यासाठी गांधीनगरला 17 सप्टेंबर 2014 रोजी घरी पोहोचले होते. यावेळी त्यांनी आईसोबत काही खास क्षण घालवले होते. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबाबेन मोदी यांचे निधन झाल्यानंतर अनेक नेत्यांनी शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
Discussion about this post