व्हीएसआरएस मराठी न्युज –मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी राज्याच्या दौरा करणार आहेत. काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी मंगळवारी ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे.
राहुल गांधी २९ आणि ३० जूनला मणिपूरमध्ये विविध ठिकाणी भेटी देणार आहेत.
राहुल गांधी मणिपूर दौऱ्यायात इंफाळमधील मदत शिबिरांना भेट देणार आहेत. तसेच सिव्हिल सोसायटीच्या प्रतिनिधींच्या भेटीगाठी घेणार आहेत. मणिपूरच्या इम्फाळ आणि चुरचंदपूर येथील नागरी समाजाच्या प्रतिनिधींशी राहुल गांधी संवाद साधणार आहेत.
Discussion about this post