व्हीएसआरएस मराठी न्युज -सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने (SPPU) यावर्षी विविध अभ्यासक्रम आणि वसतिगृहांच्या शुल्कात वाढ केली आहे. या संदर्भात विद्यार्थी व विविध विद्यार्थी संघटनांनी प्रशासनाला ही भाडेवाढ रद्द करावी, असे पत्र दिले होते, मात्र आजतागायत प्रशासनाने त्याची कोणतीही दखल घेतलेली नाही.
त्यामुळे आज 11 जुलैपासून प्रशासन आपल्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत विद्यापीठातील विद्यार्थी आणि विविध विद्यार्थी संघटना आंदोलन करणार आहेत. विदयापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे.
विद्यापीठाने लागू केलेल्या शुल्कवाढीबाबत विविध विद्यार्थी संघटना आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांची प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही. अखेर आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर फी वाढीचा आढावा घेण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली. मात्र, समितीकडून अद्याप कोणताही समाधानकारक निर्णय झालेला नाही. विद्यापीठाच्या या विचित्र कारभाराचा विद्यार्थ्यांच्या करिअरवर परिणाम होणार आहे. त्यामुळे उद्यापासून आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन करू, असे विद्यार्थ्यांनी सांगितले.
कोरोनानंतर विद्यापीठाने फी वाढ करण्याचा निर्णय घेतला. मात्र, विद्यार्थी अभ्यासकांनी या दरवाढीला विरोध करत ही फी वाढ अवाजवी असल्याचे सांगत आपली फी कमी करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे फी वाढीचा आढावा घेण्यासाठी विद्यापीठाने समिती नेमण्याचा निर्णय घेतला होता.
Discussion about this post