व्हीएसआरएस मराठी न्युज पुणे-पुणे येथील हुजूरपागा आणि स.प. महाविद्यालयात शिक्षण घेतलेली पुण्याच्या संपदा सुरेश मेहता यांच्याकडे काल भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या खाजगी सचिवाची जबाबदारी देण्यात आली आहे.
मेहता संपदा सुरेश हे महाराष्ट्र केडरचे अधिकारी आहेत.त्यांचे वडील सुरेश मेहता हे व्यवसायाने सी ए आहेत .२००८ साली त्या आय ए एस महाराष्ट्र केडर मध्ये पहिल्या आल्या .
पुण्याच्या कन्येची हि भरारी पुण्याला निश्चितच अभिमानास्पद असून आपल्या कुटुंबासह आपल्या शिक्षकवृंद आणि प्रोत्साहनदात्या प्रत्येकाला याबाबतचे श्रेय संपदा मेहता यांनी दिले आहे.
Discussion about this post