व्हीएसआरएस मराठी न्युज -संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. आज 5 सप्टेंबरला त्यांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत संपली होती. त्यानंतर आज पीएमएलए विशेष न्यायालयात पुन्हा एकदा सुनावणी घेण्यात आली.
यावेळी न्यायालयाने संजय राऊत यांच्या कोठडीत 14 दिवसांपर्यंतची वाढ केली आहे. त्यामुळे संजय राऊत आता 19 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत राहावे लागणार आहे.
Discussion about this post