व्हीएसआरएस मराठी न्युज –खासदार (Sanjay Raut) संजय राऊत यांच्या पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी, न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. त्याच्या जामीन अर्जावर आता २१ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.
खासदार संजय राऊत यांची न्यायालयीन कोठडी आज संपणार होती, मात्र आजच्या सुनावणीमध्ये कोर्टाने त्यांच्या कोठडीत पुन्हा 14 दिवसांची वाढ केली आहे. संजय राऊत गेल्या दीड महिन्यांपासून कोठडीतच आहेत. संजय राऊत यांना जामीन मिळू नये, अशी सुरवातीपासूनच ईडीची भूमिका होती.
संजय राऊत यांनी ७ सप्टेंबर रोजी विशेष न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जवळचे मानले जाणारे ६० वर्षीय संजय राऊत यांना उपनगरातील गोरेगावमधील पत्रा चाळच्या पुनर्विकासात कथित आर्थिक अनियमितता केल्याप्रकरणी 1 ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली होती.
Discussion about this post