व्हीएसआरएस मराठी न्युज –
महाभारतात शकुनी मामाची भूमिका साकारणारे अभिनेते गूफी पेंटल यांना काही दिवसांपूर्वी प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणामुळे तात्काळा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती नाजूक होती.
आता या अभिनेत्याचं निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. महाभारत मालिकेत शकुनी मामाच्या भूमिकेतून घराघरात नाव कमावलेला अभिनेता गुफी पेंटल यांचं निधन झालं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेता रुग्णालयात दाखल होता. गुफी पेंटल यांची प्रकृती खालावल्याने त्यांनाही आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते.
पण आज म्हणजेच 5 जून 2023 रोजी अभिनेत्याच्या निधनाची दु:खद बातमी समोर आली आहे. वृत्तांवर विश्वास ठेवला तर, गुफी पेंटल यांच्यावर दुपारी 4 वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. अभिनेते गूफी पेंटल हे मागील काही महिन्यांपासून आजारी होते. पण बुधवारी रात्री अचानक त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
गुफी पेंटल 31 मे पासून रुग्णालयात दाखल होते.अभिनेत्री टीना घई यांनी त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली होती. या पोस्टमध्ये त्यांनी, ‘अभिनेते गूफी पेंटल यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यासाठी प्रार्थना करा, अशी विनंती चाहत्यांना केली होती.पण आज अखेर गुफी पेंटल यांची मृत्यूशी झुंज अयशस्वी ठरली असून त्यांचं निधन झाल्याची माहिती समोर आली आहे.
Discussion about this post