व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी –पिंपरी- चिंचवड शहरातील मध्यवर्ती असलेलं ठिकाण पिंपरी भाट नगर, लिंक रोड पत्राशेड आणि चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार अज्ञात व्यक्तींनी मद्यधुंद अवस्थेत हवेत गोळीबार केला आहे.
अगोदर रॉबरीच्या उद्देशाने हा गोळीबार केल्याचं सांगितलं जातं होत. पण, अद्याप गोळीबाराच कारण समजू शकलेलं नाही. तिन्ही घटनास्थळी पिंपरी पोलीस, चिंचवड पोलिस, गुंडा विरोधी पथक, गुन्हे शाखा युनिट दाखल झाले आहेत. नेमका हा गोळीबार रॉबरी च्या उद्देशाने केला आहे की आणखी काही कारण आहे याचा तपास पोलीस करत आहेत.
Discussion about this post