व्हीएसआरएस मराठी न्युज -आयएनएस विक्रांत प्रकरणी कोट्यवधींच्या निधी अपहारप्रकरणी भाजप नेते किरीट सोमैया , त्यांचा मुलगा नील आणि इतर जणांविरुद्ध बॉम्बे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माजी सैनिकाने केलेल्या फसवणुकीच्या तक्रारीवर गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
आयएनएस विक्रांत प्रकरणी कोट्यवधींच्या निधी अपहारप्रकरणी भाजप नेते किरीट सोमैया , त्यांचा मुलगा नील आणि इतर जणांविरुद्ध बॉम्बे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी सैनिकाने केलेल्या फसवणुकीच्या तक्रारीवर गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विक्रांतच्या नावाखाली कोट्यवधी रुपये लाटल्याचा आरोप केला होता.
सोमैयांचा नवा घोटाळा असून देशासोबत प्रतारणा केल्याप्रकरणी त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली होती. त्यानंतर माजी सैनिक बबन भोसले यांनी रात्री उशिरा ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार केली. पोलिसांनी सोमैया पिता-पुत्रांवर कलम 420, 406 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे, सोमैया पिता – पुत्रांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
Discussion about this post