पिंपरी-चिंचवड | (व्हीएसआरएस न्यूज) | त्यासाठी विद्यार्थ्यांची वर्षांतून दोनदा मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांचे आरोग्य निरोगी रहावे, यासाठी महापालिकेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच दिव्यांग अथवा विविध आजार असलेल्या विद्यार्थ्यांच्या आजाराची सर्व माहिती शिक्षण विभाग ठेवणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांनी दिली.
पालिका शाळेतील मुलांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे, यासाठी शिक्षण विभागातर्फे विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत. शहरात महापालिकेच्या 18 माध्यमिक, 110 प्राथमिक 1 संतपीठ अशा 129 शाळा आहेत. या शाळांमध्ये 42 हजार पेक्षा जास्त मुले आणि मुली शिक्षण घेत आहेत. पालिका शाळेतील मुलांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे, यासाठी शिक्षण विभागातर्फे विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत.
38 शाळांमध्ये ब्रॅन्डिंग पीसीएमसी स्कूल संकल्पना राबविण्यात येत आहे. याच अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी नुकताच जल्लोष शिक्षणाचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यानुसार शाळांमध्ये मुलभूत आणि इतर सुविधांसाठी निधीही उपलब्ध करून देण्यात येत आहे. सर्व शाळांच्या इमारतींना एकच रंग देण्यात येत आहे.
यासाठी आकांक्षा फाऊंडेशनसह आदींची मदत घेण्यात येत आहे. याबाबत माहिती देताना अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे म्हणाले, महापालिका शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी आणि मुलांना उच्च दर्जाच्या सुविधा, शिक्षण देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रीय बाल सुरक्षाकडून वर्षांतून एकदा विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.
Discussion about this post