व्हीएसआरएस मराठी न्युज –
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) 1 फेब्रुवारी रोजी 2023-24 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
अर्थमंत्र्यांनी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हलव्याचे वाटप करून अर्थसंकल्पाच्या दस्तऐवजाला अंतिम स्वरूप दिले. यावेळी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या व्यतिरिक्त वित्त मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
अर्थसंकल्प तयार करण्यात गुंतलेल्या अधिकाऱ्यांच्या ‘लॉक इन’ प्रक्रियेपूर्वी हा पारंपरिक सोहळा आयोजित केला जातो. 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री 2023-24 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करतील. अर्थसंकल्प तयार करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. अर्थ मंत्रालयाने आपल्या ट्विटर हँडलवरून याची घोषणा केली आहे.
अर्थसंकल्प तयार करणारे सर्व अधिकारी व इतर कर्मचारी यांना या हलवा कार्यक्रमापासून ते अर्थसंकल्प सादर होईपर्यंत एकाच ठिकाणी कोंडून ठेवले जाते. अर्थसंकल्पाची गुप्तता राखण्यासाठी असे केले जाते. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर या अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुटुंबीयांना किंवा अन्य नातेवाईकांना भेटण्याची परवानगी दिली जाते.
Discussion about this post