व्हीएसआरएस मराठी न्युज -देशाचा 15 वा राष्ट्रपती निवडण्यासाठी उद्या सोमवारी निवडणूक होणार आहे. राष्ट्रपतिपदासाठी भाजपा नेतृत्वातील रालोआच्या द्रौपदी मुर्मू आणि विरोधी आघाडीचे यशवंत सिन्हा यांच्या लढत होत आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची मुदत 25 जुलैला संपत आहे. 21 जुलैला राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीची मतमोजणी होणार आहे.
राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत सर्व खासदार आणि आमदार मतदान करीत असतात. या निवडणुकीतील मतांचे एकूण मूल्य 10 लाख 86 हजार 431 आहे. मुर्मू यांना मिळणारा वाढता पाठिंबा पाहता, साठ टक्क्यांपेक्षा जास्ते मते त्यांना मिळू शकतात. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. मुर्मू या देशातील पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपती ठरणार आहेत तसेच या पदावर विराजमान होणार्या त्या दुसर्या महिला राहणार आहेत.
संसद भवन तसेच प्रत्येक राज्याच्या new President election राजधानीतील विधानभवनात या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने मतपत्रिका, मतपेट्या आदी साहित्य सर्व राज्यांमध्ये पोहोचवले आहे. द्रौपदी मुर्मू तसेच यशवंत सिन्हा यांनी देशातील विविध राज्यांच्या राजधानीत जाऊन प्रचार केला. झारखंडच्या माजी राज्यपाल असलेल्या द्रौपदी मुर्मू यांच्या उमेदवारीला भाजपाच्या नेतृत्वातील रालोआतील मित्रपक्षांशिवाय अन्य काही पक्षांनीही पाठिंबा दिला आहे. बिजू जनता दल, बसपा, वायएसआर काँग्रेस, जनता दल सेक्युलर, तेलुगू देसम, शिवसेना तसेच शिरोमणी अकाली दलाने पाठिंबा दिला आहे.
माजी केंद्रीय मंत्री असलेले यशवंत सिन्हा यांच्या उमेदवारीला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक, सपा, डावे पक्ष यांनी पाठिंबा दिला आहे. अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षानेही यशवंत सिन्हा यांच्या उमेदवारीला पाठिंबा जाहीर केला आहे.
लोकसभा तसेच राज्यसभेचे खासदार तसेच देशातील सर्व विधानसभांचे आमदार या निवडणुकीत मतदान करू शकतात. राज्यसभेतील तसेच विधान परिषदेतील नामनियुक्त सदस्यांना मतदानाचा अधिकार नसतो. या निवडणुकीत खासदाराच्या मतांचे मूल्य 700 आहे, तर प्रत्येक राज्यातील आमदाराच्या मतांचे मूल्य वेगवेगळे असते. उत्तरप्रदेशमधील आमदारांच्या एका मतांचे मूल्य 208 आहे, तर केंद्रशासित पुडुचेरीमधील आमदारांच्या मताचे मूल्य सर्वांत कमी म्हणजे 16 आहे. पहिल्या पसंतीची मते, दुसर्या पसंतीची मते याप्रमाणे या निवडणुकीत मतपत्रिकेवर 1 आणि 2 चा आकडा लिहून मतदान करायचे आहे. खासदारांना हिरव्या रंगाची तर आमदारांसाठी गुलाबी रंगाची मतपत्रिका ठेवण्यात आली आहे.
Discussion about this post