व्हीएसआरएस न्युज कोलकाता – पश्चिम बंगालच्या पोटनिवडणुकीत विजय मिळवल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी आज आमदारकीची शपथ घेतली.
त्यांच्यासोबत तृणमूल काँग्रेसचे तीन नव्या आमदारांनीसुद्धा शपथ घेतली. यामध्ये झाकीर हुसैन आणि अमीरुल इस्लाम यांचा समावेश आहे. राज्यपाल जगदीप धनखड यांनी तिघांनाही आमदारकीची शपथ दिली. शपथविधी सव्वा बाराच्या सुमारास होणार होता. मात्र राज्य सरकारने केलेल्या विनंतीनुसार दुपारी दोन वाजता शपथविधी पार पडला. यावेळी ममता बॅनर्जी यांच्या सरकारमधील वरिष्ठ मंत्री आणि भाजपमधून तृणमूल काँग्रेसमध्ये आलेले मुकुल रॉय उफस्थित होते.
तृणमूलच्या सर्व आमदारांनी बांग्ला भाषेत आमदारकीची शपथ घेतली.
Discussion about this post