व्हीएसआरएस न्युज मुंबई -मुख्यमंत्री ममता बॅनर्जी भवानीपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवार असल्याने या निवडणुकीकडे पश्चिम बंगालसह देशाचे लक्ष लागून राहिले आहे.
दरम्यान मागच्या काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये नंदीग्रामधून ममता बॅनर्जी यांचा पराभव झाला होता. यामुळे त्या भवानीपूर विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवत आहेत.
याशिवाय, मुर्शिदाबाद जिल्ह्याच्या समसेरगंज आणि जंगीपूर विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणुकांचे निकालही जाहीर होणार आहेत.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममत बॅनर्जी यांचा सामना भवानीपूर मतदारसंघात भाजपच्या प्रियांका तिब्रेवाल आणि सीपीआय-एमचे श्रीजीब बिस्वास यांच्याशी आहे.
Discussion about this post