व्हीएसआरएस न्युज प्राधिकरण-‘आजादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिका व स्मार्ट सिटी लिमिटेड यांच्यावतीने आयोजित सायक्लोथॉन स्पर्धेला आज उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेसाठी २ हजार स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. आज (दि.०३) सकाळी ६ वाजता निगडी भक्ती-शक्ती चौक येथून सायक्लोथॉन स्पर्धा सुरू झाली.
१ ते ३ ऑक्टोबर या कालावधीत केंद्र शासनाच्या सूचनांनुसार शहरामध्ये आजादी का अमृत महोत्सव साजरा होत आहे. या महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी आज सायक्लोथॉन स्पर्धा संपन्न झाली. उपमहापौर नानी घुले, महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी झेंडा दाखवून स्पर्धेची सुरूवात केली.
यावेळी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, मनसे गटनेता सचिन चिखले, नगरसेविका शैलजा मोरे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदाडे, कार्यकारी अभियंता बापु गायकवाड, कार्यकारी अभियंता प्रमोद ओंबासे आदी उपस्थित होते.
Discussion about this post