व्हीएसआरएस न्युज पिंपरी- शहराच्या विविध भागातील 762 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (बुधवारी) नोंद.
शहरातील 42 आणि महापालिका हद्दीबाहेरील 16 अशा 58 जणांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 3 हजार 775 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 2 लाख 43 हजार 947 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.
आज 1 हजार 980 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
गेल्या 24 तासात भारतात 2 लाख 67 हजार 334 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.
तर 4 हजार 529 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 3 लाख 89 हजार 851 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.
आतापर्यंतची आकडेवारी
भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 कोटी 54 लाख 96 हजार 330 वर गेला आहे. देशात 2 कोटी 19 लाख 86 हजार 363 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत 2 लाख 83 हजार 248 रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. तर 32 लाख 26 हजार 719 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.
आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 18 कोटी 58 लाख 9 हजार 302 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी
देशात 24 तासात नवे रुग्ण – 2,67,334
देशात 24 तासात डिस्चार्ज – 3,89,851
देशात 24 तासात मृत्यू – 4529
एकूण रूग्ण – 2,54,96,330
एकूण डिस्चार्ज – 2,19,86,363
एकूण मृत्यू – 2,83,248
एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 32,26,719