व्हीएसआरएस न्युज निगडी-पिंपरी चिंचवडमध्ये हायब्रिड पध्दतीच्या नवीन गॅस-विद्युत दाहिन्या बसविण्यासाठी सुमारे २५ कोटी एवढ्या रक्कमेपर्यंतचा खर्च पुरवठा (अनुदान) करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
अंत्यसंस्कार करण्यासाठी शवदाहिन्यांची (गॅस व विद्युत दाहिनी) कमतरता भासू लागली आहे. हीच परिस्थिती कायम राहिल्यास अंत्यसंस्कार अभावी मृतदेहांची हेळसांड होणार आहे. हे लक्षात येताच शहरातील शवदाहिन्यांची संख्या वाढवण्याची मागणी राज्य सरकारकडे केली होती.
मृतदेहाची वेळेत योग्य विल्हेवाट लावण्यासाठी विद्युत दाहिन्यांची संख्या वाढवण्याची मागणी पालकमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होती, अशी माहिती माजी आमदार लांडे यांनी दिली होती.
राज्य सरकारने पिंपरी चिंचवडमध्ये आवश्यक त्या ठिकाणी नवीन शवदाहिन्या बसवण्यासाठी हिरवा कंदील दाखविला आहे. ज्या भागातील शवदाहिन्यांवर अतिरिक्त ताण पडत आहे, त्याठिकाणी नवीन हायब्रिड पध्दतीच्या गॅस व विद्युत इंधनावर चालणा-या दाहिन्या कार्यान्वीत करण्यात येणार आहेत. त्यासाठीच्या कामाचा आराखडा आणि होणारा अपेक्षित खर्चाचा अहवाल सादर करण्याचे आदेश महापालिका प्रशासनाला दिले आहेत.
त्यामध्ये निगडी, भोसरी, कस्पटे वस्ती, पिंपळे गुरव, कासारवाडी या भागातील दाहिन्यांचा प्रामुख्याने समावेश करावा लागणार आहे. या कामासाठी सुमारे २५ कोटी पर्यंतच्या खर्चाची रक्कम (अनुदान) राज्य सरकार पालिकेला अदा करणार आहे.
हे काम मंजूर करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाठपुरावा करून पुण्यापाठोपाठ पिंपरी चिंचवडला प्राधान्य दिले आहे. याबद्दल संबंध पिंपरी चिंचवडकरांच्या वतीने माजी आमदार विलास लांडे यांनी पालकमंत्री अजित पवार यांचे प्रसिध्दीपत्रकाद्वारे आभार मानले होते.
राज्य सरकारने पिंपरी-चिंचवड महापालिकेला सुमारे 25 कोटींचे अनुदान जाहीर केले आहे. त्यापैकी 1 कोटी 25 लाख रुपयांचे अनुदान निगडीतील स्मशानभूमीमध्ये नवीन हायब्रिड पध्दतीची दाहिनी बसवण्यावर खर्ची केले जाणार आहे. 90 लाख रुपये दाहिनीचे युनिट खरेदी करण्यासाठी खर्च होतील. उर्वरीत स्थापत्य विषयक कामे करण्यासाठी 30 ते 35 लाखांचा खर्च होईल. दोन्ही मिळून सुमारे 1 कोटी 25 लाख एवढा खर्च प्रशासनाने अपेक्षित धरला आहे. ही दाहिनी विद्युत आणि गॅसवर कार्यान्वीत होणार आहे. विद्युत पुरवठा खंडीत झाल्यानंतर दाहिनी गॅसवर चालवता येणार आहे. त्यामुळे यापुढे मृतदेहावर अंतिम संस्कार करण्यासाठी नातेवाईकांना विजेची वाट पाहावी लागणार नाही.
निगडी येथील अमरधाम स्मशानभूमी येथील विद्युत गॅस दाहिनी निधी महाराष्ट्र शासनाने उपलब्ध करून दिल्याबद्दल महाराष्ट्र शासनाने मनापासून आभार प्रभाग क्रमांक १३ येथील नगरसेवक ह्यांनी दावा केला आहे की त्यामुळे महाराष्ट्र शासनाने निधी उपलब्ध करून दिला आहे तो खोटा दावा केला आहे निगडी स्मशानभूमी येथील विद्युत शवदाहीनी मध्ये गेल्या अनेक दिवसांपासून चिमणी जळाली होती तसेच विद्युत शवदाहीनी मधील कोईल नादुरुस्त झाल्यामुळे विद्युत शवदाहीनी बंद अवस्थेत होती नगरसेवक ह्यांनी कोणत्याही प्रकारची मागणी शासनाकडे केली नाही किंवा पाठपुरावा केला नाही कोरोणा रुग्ण मृत्यू प्रमाण वाढल्याने स्वतः महाराष्ट्र शासनाने निधी उपलब्ध करून दिला आहे गैरसोय निर्माण होवू नये म्हणून विशेषतः महाराष्ट्र शासनाने मनापासून आभार व्यक्त करत आहे नगरसेवक स्वतःच्या जाहिरात बाजी किंवा प्रसिद्धि साठी वेगळा प्रचार करत आहे गेल्या अनेक दिवसांपासून निगडी अमरधाम स्मशानभूमी येथे स्मशानभूमी भिंती नादुरुस्त अवस्थेत होत्या तसेच त्या ठिकाणी गवत व इतर घाणीचे साम्राज्य पसरले होते कोणत्याही नगरसेवकांनी याप्रकरणी आवाज उठवला नाही या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यासाठी आलेल्या
नातेवाईकांना बसण्याची आंघोळीचे व्यवस्था अपूर्ण आहे नगरसेवक फक्त टेंबा मिरवण्यासाठी व श्रेय घेण्यासाठी निधी महाराष्ट्र शासनाकडून त्यांनी मिळवला म्हणून खोटा अपप्रचार करत आहेत. असे आरोप समाजिक कार्यकर्ता सचिन काळभोर करत आहे.