व्हीएसआरएस मराठी न्युज –
दिल्लीत 69व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांना चित्रपटातील योगदानाबद्दल दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.अल्लू अर्जुनला पुष्पा या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा, गंगूबाई काठियावाडीसाठी आलिया भट्ट आणि मिमीसाठी कृती सेननला संयुक्तपणे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला आहे.
रॉकेट्री- द नंबी इफेक्ट’ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार देण्यात आला आहे. यावर्षी ऑगस्टमध्ये या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती. नवी दिल्लीतील विज्ञान भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्व विजेत्यांना सन्मानित केले.
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांना दोन श्रेणींमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यानुसार त्यांना बक्षीस रक्कम आणि पदव्या दिल्या जातात. या दोन श्रेणी आहेत – पहिली सुवर्ण कमळ आणि दुसरी चांदीची कमळ. गोल्डन लोटस विजेत्याला अधिक बक्षीस रक्कम मिळते, तर सिल्व्हर कमळ विजेत्याला कमी रक्कम मिळते.
Discussion about this post