व्हीएसआरएस न्युज पिंपरी- पिंपरी-चिंचवड शहरातील 18 वर्षांपुढील नागरिकांना ‘कोविशिल्ड’चा पहिला तर 45 वर्षांपुढील नागरिकांना ‘कोविशिल्ड’चा पहिला, दुसरा डोस आज (रविवारी) मिळणार आहे. तर, 18 ते 44 या वयोगटातील आणि 45 वर्षांपुढील नागरिकांना 4 केंद्रांवर ‘कोव्हॅक्सिन’चा दुसरा डोस देण्यात येणार आहे.
कै. हभप प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पिटल आकुर्डी, नूतन शाळा ताम्हाणे वस्ती, रूपीनगर, आचार्य अत्रे सभागृह, संत तुकारामनगर, अंकुशराव लांडगे सभागृह भोसरी, अहिल्याबाई होळकर महापालिका शाळा सांगवी,खिवंसरा हॉस्पिटल थेरगाव, नवीन जिजामाता रुग्णालय आणि प्रेमलोक पार्क दवाखाना या 8 केंद्रांवर 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना 300 च्या क्षमतेने लस मिळणार आहे. नोंदणी करुन स्लॉट बुक केलेल्या 10 टक्के व ऑन द स्पॉट उपस्थित असणा-या 90 टक्के लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येईल.
तर, ज्या 45 वर्षांपुढील नागरिकांनी, एचसीडब्ल्यू आणि फ्रंट लाईन वर्कर यांनी पूर्वी ‘कोविशिल्ड’ या लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्यांना ‘कोविशिल्ड’ या लसीचा दुसरा डोस हा 12 ते 16 आठवडयांच्या दरम्यान (84ते 112 दिवस) देण्यात येणार आहे. उद्या 8 केंद्रांवर कोविशिल्डचा पहिला, दुसरा डोस देण्यात येणार आहे.
‘कोविशिल्ड’चा पहिला, दुसरा डोस ‘या’ 8 केंद्रांवर मिळणार !
आरटीटीसी सेंटर, यमुनानगर रुग्णालय, मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल, कासारवाडी दवाखाना, अण्णासाहेब मगर शाळा पिंपळेसौदागर, जुने तालेरा रुग्णालय, सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा भोसरी आणि पिंपळेनिलख येथील महापालिकेची इंगोले शाळा या केंद्रावर कोविशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस उद्या सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत दिला जाणार आहे.
कोव्हॅक्सिन’चा दुसरा डोस या केंद्रांवर मिळणार !
कर्मवीर भाऊराव पाटील वाघेरे ड प्रभाग, पिंपळेगुरव माध्यमिक शाळा या केंद्रावर ‘कोव्हॅक्सिन’चा पहिला डोस घेऊन 28 दिवस पूर्ण झालेल्या 45 वर्षांपुढील नागरिकांना 100 च्या क्षमतेने दुसरा डोस देण्यात येणार आहे. तर, 18 ते 44 या वयोगटातील नागरिकांना नवीन भोसरी रुग्णालय आणि यशवंतराव प्राथमिक महापालिका शाळा ग प्रभाग येथे 100 च्या क्षमतेने ‘कोव्हॅक्सिन’चा दुसरा डोस देण्यात येणार आहे.
Discussion about this post