व्हीएसआरएस न्युज पिंपरी- डॉक्टर डे निमित्त आमदार बनसोडे यांनी शहरातील डॉक्टरांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान केला. यावेळी डॉ. अभय तांबिले, डॉ. सत्यजित पाटील, डॉ. निलेश लोंढे, डॉ. सुनील पाटील, डॉ. प्रशांत पाटोळे, डॉ पवन धारोरकर, डॉ. प्रशांत बंब डॉ. दत्तात्रय कोकाटे, डॉ. सुहास जाधव, डॉ. नंदकुमार माळशिरसकर, डॉ. जबीन पठाण, डॉ. नूतन वाघ, डॉ. सोनाली काटे, डॉ. अमित वाघ. यांना सन्मानित करण्यात आले.
कोरोना वायरस संकटरामध्ये कोरोना युद्ध म्हणून आपल्या घरापासून लांब राहून जीवाची पर्वा न करता तुम्ही डॉक्टर मंडळी अहोरात्र काम करत आहात. आपल्या कामामती निष्ठा, मानवता, बंधुता व सार्वजनिक आरोग्य या भावनेतून सर्व मानवाची आपण सेवा करीत आहात म्हणून म्हणतो देवा सारखे येती धावून, देवा सारखे करतात काम, माणसातल्या या देवाला सदैव आमचा सलाम या शब्दात आमदार बनसोडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
कोरोना व्हायरस आता आपला ‘स्ट्रेन’ बदलत असल्याचे समोर आल्यामुळे खबरदारी जास्त घ्यावी लागेल. निर्बंध शिथिल करण्यात आल्यामुळे बेजबाबदारपणे गर्दी न करता खबरदारी घेतली पाहिजे. कठोर नियम, सर्वांसाठी लोकल निर्बंध हे निर्णय जनतेच्या भल्यासाठीच आहेत, हे नागरिकांनी लक्षात घेतले पाहिजे, कोरोनाच्या दोन्ही लाटांवर पिंपरी चिंचवड ने यशस्वीरीत्या मात केली आहे. आता रुग्णसंख्या नियंत्रणातही आहे. त्यामुळे तिसरी लाट येऊच नये अशी अपेक्षा आहे.
Discussion about this post