व्हीएसआरएस न्युज पिंपरी नायजेरिया मधून आलेल्या ०२ व संपर्कातील ०१ अशा ०३ रुग्णांचे रिपोर्ट कोविड- १९ पॉझिटिव्ह आलेले असून त्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नवीन जिजामाता रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले आहे.
तसेच त्यांच्या संपर्कामधील नागरिकांना गृहविलगीकरणामध्ये ठेवण्यात आलेले आहे. या सर्वांची प्रकृती स्थीर असल्याची माहिती महापालिकेचे सहा. आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी दिली.
दरम्यान, दक्षिण आफ्रिका आणि युरोपीय देशांमध्ये ‘ओमिक्रॉन’ हा करोनाच्या नव्या उत्परिवर्तित विषाणू आढळून येत असून नायजेरिया या देशामध्ये सदर विषाणू अद्याप आढळून आलेला नसल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे.
महापालिकेने दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, आफ्रिका आणि युरोपीय देशांमध्ये ‘ओमिक्रॉन’ या करोनाच्या नव्या उत्परिवर्तित (Mutation) विषाणूचा फैलाव वेगाने वाढत असल्याने केंद्र व राज्य शासनाने खबरदारीच्या उपाययोजना करण्यास सूचित केलेले आहे. त्यानुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.
Discussion about this post