व्हीएसआरएस न्युज चिखली-चिखलातील स्वर्गीय अलकाताई यादव प्रतिष्ठाण आणि जय भवानी प्रतिष्ठाण यांच्या संयुक्त विद्यमाने चिखली गावासह पिंपरी चिंचवड शहरातील गोरगरीब कुटुंबातील मुला-मुलींसाठी मोफत विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
नागरिकांच्या मुला-मुलींच्या विवाहांची जबाबदारी चिखली गावातील जय भवानी प्रतिष्ठाणचे अध्यक्ष जितेंद्र यादव आणि त्यांच्या पत्नी शीतल यादव यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे.
विशेष म्हणजे सर्वधर्मियांसाठी हा मोफत विवाह सोहळा होणार आहे. यामध्ये वधू-वरांचा पोशाख, वऱ्हाडी मंडळींसाठी जेवण, संसारोपयोगी साहित्य ( झाल), भटजी व लग्न समारंभासाठी अन्य आवश्यक बाबी मोफत पुरविण्यात येणार आहेत.
हा विवाह समारंभ कोरोनाचे नियम व महापालिका आणि शासन निर्देशांचे पालन करून आयोजित करण्यात येणार आहे. आतापर्यंत सर्वधर्मीय मिळून एकूण आठ विवाहांची नोंद झाली आहे. कोरोना संकट असेपर्यंत ही नोंदणी सुरु राहणार आहे. येत्या 4 जूनला दोन विवाह आयोजित करण्यात आले आहेत. उर्वरित विवाह टप्प्याटप्प्याने आयोजित केले जाणार आहेत.
या सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी फक्त वधू आणि वर यांनी नावनोंदणी करायची आहे. तसेच अधिक माहितीसाठी.9860656086 /98505523232 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष जितेंद्र यादव तसेच शितल यादव यांनी केले आहे.