व्हीएसआरएस न्युज पिंपरी पिंपरी-चिंचवड शहरातील 18 वर्षांपुढील नागरिकांना ‘कोविशिल्ड’चा पहिला तर 45 वर्षांपुढील नागरिकांना ‘कोविशिल्ड’चा पहिला, दुसरा डोस उद्या (शनिवारी) 16 केंद्रांवर मिळणार आहे. तर, 18 ते 44 या वयोगटातील आणि 45 वर्षांपुढील नागरिकांना 2 केंद्रांवर ‘कोव्हॅक्सिन’चा दुसरा डोस देण्यात येणार आहे.
18 ते 44 वयोगटातील नागरिकांना ‘कोविशिल्ड’ चा पहिला डोस ‘या’ केंद्रांवर मिळणार !
सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा भोसरी, कै. हभप प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पिटल आकुर्डी, यमुनानगर रुग्णालय, आचार्य अत्रे सभागृह, संत तुकारामनगर, अहिल्याबाई होळकर महापालिका शाळा सांगवी, खिवंसरा हॉस्पिटल थेरगाव, नवीन जिजामाता रुग्णालय आणि प्रेमलोक पार्क दवाखाना या 8 केंद्रांवर 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना 300 च्या क्षमतेने लस मिळणार आहे.
‘कोविशिल्ड’चा पहिला, दुसरा डोस ‘या’ 8 केंद्रांवर मिळणार !
प्राथमिक शाळा म्हेत्रे वस्ती, इएसआयएस हॉस्पिटल मोहननगर, दीनदयाळ शाळा संत तुकारामनगर पिंपरी, नवीन भोसरी रुग्णालय, कासारवाडी दवाखाना,महापालिका शाळा रहाटणी, पिंपळेनिलख येथील महापालिकेची इंगोले शाळा आणि जुने तालेरा रुग्णालय या केंद्रावर कोविशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस उद्या सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत दिला जाणार आहे. ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन ॲप या पद्धतीने हे लसीकरण करण्यात येणार आहे. तर, शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना नवीन जिजामाता रुग्णालयात लस देण्यात येणार आहे.
कोव्हॅक्सिन’चा दुसरा डोस ‘या’ केंद्रांवर मिळणार !
18 ते 44 या वयोगटातील लाभार्थ्यांना फकीरभाई पानसरे उर्दु शाळा चिंचवड, येथे 100 च्या क्षमतेने ‘कोव्हॅक्सिन’चा दुसरा, तर 45 वर्षांपुढील नागरिकांना पिंपळेनिलख येथील महापालिकेची इंगोले शाळा येथे ‘कोव्हॅक्सिन’चा दुसरा डोस देण्यात येणार आहे.
Discussion about this post