व्हीएसआरएस न्युज पिंपरी -शहरातील 2 रुग्णांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 4 हजार 293 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 2 लाख 59 हजार 154 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.
आज दिवसभरात 6 हजार 117 नागरिकांचे लसीकरण झाले आहे. आजपर्यंत 7 लाख 9 हजार 83 जणांनी लस घेतली आहे.
पुणे शहरामध्ये कोरोनाचा (Corona in Pune city) प्रादुर्भाव कमी होत. आज पुणे शहरातील नवीन रुग्णांची (Pune Corona) संख्या दोनशेच्या आत आली आहे. तर अॅक्टिव्ह रुग्णांची (active patient) संख्या तीन हजाराच्या आत आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. मागील काही दिवसांपासून शहरामध्ये बरे होणाऱ्या रुग्णांपेक्षा नवीन रुग्णांची संख्या अधिक होती. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये (Pune city) 150 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 249 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे.
पुणे शहरामध्ये सध्या 2679 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 290 रुग्ण गंभीर आहेत. तर 448 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 4084 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. आतापर्यंत 26 लाख 97 हजार 692 तपासणी करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
Discussion about this post