व्हीएसआरएस न्युज पिंपरी- उद्या (बुधवारी) लसीकरण कामकाजाची साप्ताहिक सुट्टी करण्यासाठी महापालिकेची सर्व लसीकरण केंद्रे बंद राहणार आहेत.
शहरातील 4 आणि महापालिका हद्दीबाहेरील 2 अशा 6 रुग्णांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 4 हजार 283 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 2 लाख 57 हजार 506 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.
सध्या 1 हजार 138 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 340 रुग्ण गृहविलगीकरणात असून 798 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 40 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 418 आहेत.
आज दिवसभरात 10 हजार 274 जणांचे लसीकरण झाले. तर, आजपर्यंत 6 लाख 46 हजार 3 जणांनी लस घेतली.
Discussion about this post