व्हीएसआरएस न्युज पिंपरी- युवासेना प्रमुख, व महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ह्यांच्या वाढदिवसाच्या निम्मित पिंपरी युवासेनेकडून आयोजित आदित्य जनसेवा सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी कोरोना काळात आपल्या जिवाची पर्वा न करता अविरत सेवा करणाऱ्या येथील सफाई कर्मचाऱ्यांना त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मास्क,सॅनिटायझर व हॅन्डग्लोझचे वाटप करण्यात आले.
ह्यावेळेस समाजसेविका शीलामामी जाधव,आरोग्य अधिकारी धनश्री जगदाळे,रवी नगरकर, संजय पिंपळे उपस्थित होते.कार्यक्रम चे आयोजन पिंपरी विभागसंघटक निलेश हाके ह्यांनी केले होते.