व्हीएसआरएस न्युज राज्यात आता कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात येताना दिसत आहे. राज्यात 3,286 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 933 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.
राज्यात आतापर्यंत 63 लाख 57 हजार 012 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.23 टक्के आहे. राज्यात आज 51 कोरोना बाधितांचे मृत्यू झाले असून सध्या राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्के एवढा आहे.
पुणे महापालिका हद्दीत दिवसभरात 171 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर शहरातील विविध रुग्णालयातून 105 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आज 8 हजार 32 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या. दरम्यान दिवसभरात 2 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या शहरात 1637 कोरोना संक्रमित रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
भारतात कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या जवळपास तीन लाखांवर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 31,382 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तसेच 318 कोरोना रुग्णांनी जीव गमावला आहे. तसेच 24 तासांत 32,542 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरात (शुक्रवारी, दिवसभरात 105 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 107 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिवसभरात तीन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
शहरात कोरोनाबाधितांची आजवरची संख्या 2 लाख 73 हजार 204 एवढी झाली आहे. तर आजवर 2 लाख 68 हजार 413 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
Discussion about this post