व्हीएसआरएस न्युज पिंपरी –शहराच्या विविध भागातील 175 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (शनिवारी) नोंद.
शहरातील 1 आणि महापालिका हद्दीबाहेरील 1 अशा 2 रुग्णांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 4 हजार 344 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 2 लाख 64 हजार 536 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.
सध्या 930 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 201 रुग्ण गृहविलगीकरणात असून 729 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) जगभरात वाढत्या कोरोना संसर्गाबद्दल चिंतित असल्याचे दिसत आहे. त्यांनी सर्व देशांना इशारा दिला की जर लसीकरण मोहिमेला गती मिळाली नाही तर डेल्टासह कोरोनाचे नवीन व्हेरियंट सध्याच्यापेक्षा जास्त प्राणघातक असू शकतात.
डब्ल्यूएचओचे आपत्कालीन संचालक मायकल रायन म्हणाले की, लसीकरणावर भर देताना, डेल्टा व्हेरिएंट हा आमच्यासाठी एक इशारा आहे की आपण ते लवकर दाबण्यासाठी आवश्यक पावले उचलली पाहिजेत,अन्यथा परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते. डेल्टा व्हेरिएंटचे धोकादायक परिणाम पाहता त्यावर मात करण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे.
Discussion about this post