व्हीएसआरएस न्युज शहरात आज कोरोना चे नवीन 216 रुग्ण संख्या नोंद.
त्यानुसार आजपर्यंत पिंपरी-चिंचवड शहरात दोन लाख 65 हजार 393 जण कोरोना बाधित झाले, तर मागील 24 तासात तीन जणांचा मृत्यू झाला आहे त्यामध्ये पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत दोन जणांचा मृत्यू झाला तर एक पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दी बाहेरील आहे. आज पर्यंत 4351 जणांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे.
तसेच आज 228 जण कोरोना मुक्त झाले तर आज पर्यंत दोन लाख सात हजार 144 जण कोरोना मुक्त झाले आहेत.
‘कोविशिल्ड’ लसीचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्यामुळे उद्या (शुक्रवारी) फक्त ‘कोव्हॅक्सिन’ लसीचा पहिला, दुसरा डोस देण्यात येणार आहे. 18 ते 44 आणि 45 वर्षांपुढील नागरिकांना उद्या ‘कोव्हॅक्सिन’ची लस दिली जाणार आहे. किऑस्कद्वारे टोकन घेतलेल्या, ऑनलाइन पद्धतीने बुकिंग केलेल्या आणि कोविन ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅप नोंदणीद्वारे लाभार्थ्यांचे लसीकरण होणार आहे.
18 ते 44 वयोगटातील ऑनलाईन, किऑस्कद्वारे नोंदणी केलेल्यांना या केंद्रांवर लस मिळणार!
सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा भोसरी, कै. हभप प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पिटल आकुर्डी, यमुनानगर रुग्णालय, आचार्य अत्रे सभागृह, पिंपरी, अहिल्याबाई होळकर शाळा सांगवी, खिंवसरा पाटील हॉस्पिटल थेरगाव, जुने जिजामाता रुग्णालय आणि जुने तालेरा रुग्णालय येथे ‘कोव्हॅक्सिन’चा पहिला, दुसरा डोस देण्यात येणार आहे.
45 वर्षापुढील नागरिकांना ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन, किऑस्क प्रणालीद्वारे या केंद्रांवर मिळणार पहिला, दुसरा डोस!
प्राथमिक शाळा म्हेत्रे वस्ती, ईसआयएस हॉस्पिटल मोहननगर, मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल, नवीन भोसरी रुग्णालय, कासारवाडी दवाखाना, अण्णासाहेब मगर शाळा पिंपळेसौदागर, पिंपळेनिलख येथील महापालिकेची इंगोले शाळा आणि प्रेमलोक पार्क दवाखाना येथे कोव्हॅक्सिन’चा पहिला, दुसरा डोस देण्यात येणार आहे. ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन, किऑस्क प्रणालीद्वारे सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत लसीकरण करण्यात येणार आहे. ‘कोविशिल्ड’ लसीचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने उद्या ‘कोविशिल्ड’ची लस मिळणार नाही.
Discussion about this post