व्हीएसआरएस न्युज निगडी आज दि.२६रोजी निगडी गाव येथे विजय धायगुडे यांच्या स्वस्त किमतींच्या जेनेरिक औषधांच्या दुकानाचे उद्घाटण पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या हस्ते उद्घाटण करण्यात आले.त्यावेळी माजी उपमहापौर शैलजा मोरे,नगरसेविका वैशाली काळभोर ,शर्मिला बाबर, रेशन कार्ड समितीच्या सदस्या सौ.जयश्री काळभोर, उद्योजक निलेश शिंदे, तुकाराम काळभोर आदी उपस्थित होते.
पंतप्रधान जन औषधी परियोजनेवर आधारीत जेनेरिकार्ट पुरस्कृत आपल्या सेवेत सुरु करीत आहोत….
प्रधानमंत्री जन औषधी योजना ही भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 जुलै 2015 रोजी जाहीर केलेली योजना आहे. या योजनेअंतर्गत उच्च दर्जाच्या जेनेरिक औषधांच्या किमती सरकारकडून बाजारभावापेक्षा कमी केल्या जात आहेत. सरकारने जन जन औषधी स्टोअर्सची स्थापना केली आहे, जेथे जेनेरिक औषधे उपलब्ध केली जात आहेत.
या औषधांची किंमत सामान्य वैद्यकीय स्टोअरमध्ये उपलब्ध असलेल्या ब्रँडेड औषधांपेक्षा खूपच कमी आहे. यामुळे रुग्ण आणि त्यांच्या त्रासलेल्या नातेवाईकांच्या खिशावर खूप कमी भार पडेल.
Discussion about this post